विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून काँग्रेस १००, ठाकरे गट १०० तर राष्ट्रवादी शरद पवार गट ८० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे.यात १०-१२ जागा घटक पक्षांना देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
या फॉर्म्युलामध्ये मुख्यमंत्रीपदाचा वादही सोडवण्यात आला आहे. त्यात ज्या पक्षाला जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे ठरल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक झाली त्यात या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांनी हा फॉर्म्युला सांगितल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता जागावाटपावरुन कोठेही ठिणगी पडू नये म्हणून तिन्ही पक्ष सावध आहे. या तिन्ही पक्षांनी आपला स्वतंत्र पाहणी अहवाल तयार केला आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नियमीत बैठका होणार असून त्यात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.