इचलकरंजी रनर्स फौंडेशन आणि दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित आयएमफिट क्लबची पाचवी इचलकरंजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी अभूतपूर्व उत्साहात पार पडली. सुमारे २५०० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये ५ वर्षापासून ते ८० वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग होता. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य रस्त्यावर नागरिक मोठ्या संख्येने उतरल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पृथ्वी भगत, रमेश जैन, राजेश मर्दा, सुमित पाटील, दै. महासत्ताचे चंद्रकांत मिठारी, नेत्रपाल शर्मा, मिलिंद बिरादार, मदन गोरे, विवेक मगदूम यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ झाला.
आजच्या धावपळीच्या जीवनामुळे सर्वांचेच आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यातूनही आरोग्यासाठी वेळ काढून संपन्न आरोग्य मिळावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी २१, १० आणि ५ किलोमिटर अंतर अशा तीन विभागात स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे रेस डायरेक्टर अंकित सोंथलिया, संदीप मोघे तसेच रनिंग रुट व हायड्रेशनचे नियोजन प्रमुख भरत केटकाळे, महेश मेटे यांनी काम पाहिले. पहाटेच्या सुमारास वार्मअप (झुंबा ) घेण्यात आले. ६ वाजता डिकेटीई राजवाडा येथून स्पर्धेची सुरुवात झाली.
स्पर्धकांसाठी स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी, एनर्जी ड्रिंक, फ्रुटची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मार्गावर मेडिकल सपोर्टसाठी अलायन्स हॉस्पिटल व डॉ. अनिकेत पोतदार यांची मदत झाली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संतोष
शेळके, नितेश पाटणी, गोरखनाथ सावंत, सुमित लाहोटी, उदय मेटे, अभिजीत मांगलेकर, विनायक खोत, स्वप्निल माने, रमेश पारिख, संदिप मोघे, भारत केटकाळे आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-२१ किलोमीटर ( पुरुष ) १६ ते ३० वयोगट –
१ ) आदेश कांबळे, २) अनिल माने, ३) राज आलदी.
३१ ते ४५ वयोगट – १) राहुल शिरसाट, २) सूरज पाटील, ३) सचिन बुरसे.
४५ ते ६० वयोगट – १) श्रेणिक पाटील, २) मंदार हर्डीकर, ३) डॉ. जीवन यादव.
आणि ६१ वर्षे वयोगट – १) लक्ष्मण आमणे, २) रजनीकांत पाटील, ३) राधेश्याम भुतडा.
(महिला वर्गात) १६ ते ३० वयोगट –
१) धनश्री जाधव, २) माधुरी बनसोडे, ३) ज्योती हुबळीकर.
३१ ते ४५ वयोगट-१) जिया गफार शेख, २)राधिका माने, ३) श्रद्धा मोघे.
१० किमी अंतराच्या स्पर्धेत ( पुरुष ) – १६ ते ३० वयोगट – १) संकेत गुरव, २) धर्मात्मा आझाद, ३) अवधूत जाधव.
(३१ ते ४५ वयोगट) १) अभिजित देशपांडे, २) संजय सूर्यवंशी, ३) देवेंद्र मिसाळ
४६ ते ६० वयोगट – १) नितीन वाघमारे, २) महेशकुमार बनकर, ३) सुहास पाटील.
तर ६१ वर्षवरील वयोगट –
१) दत्तात्रय कुलकर्णी, २) राकेश मुदगल, ३) नारायण जाधव.
तर १० किमी (महिला गट) – १६ ते ३० वयोगट –
१) दिव्यानी लायकर, २) अंजली वयासी, ३) भाग्यश्री म्हेत्रे.
३१ ते ४५ वयोगट – १) डॉ. नंदिता नभा जोशी, २) रेखा पाटील, ३) डॉ. केतकी साखरपे.
तर ४६ ते ६० वयोगट – १ ) दीपा तेंडुलकर, २) अंजली कुलकर्णी, ३) डॉ. प्रांजली धामणे.