…अन्याय करेल त्याला जागेवर ठेवायचं नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उद्धव ठाकरे हे लवकरच पेणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.(political) तसेच या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

शिशिर धारकर यांच्यासोबत पक्ष प्रवेशानंतर जमलेल्या कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी (political) शिवसैनिकांचं मातोश्रीवर स्वागत केलं. ते म्हणाले की, मला एका गोष्टीचं समाधान आहे की तुम्ही लढवय्यांच्या सेनेमध्ये प्रवेश केला आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांच्या सेनेत तुम्ही प्रवेश केला आहे. काही जण बघीतले, त्यांचाआव मोठा होता, पण जरा डोळे वटारले की पळून गेले. तुम्ही पळपुटे नाहीत याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावरती वार करणं ही आपली ख्याती आहे. अन्याय सहन करायचा नाही, अन्याय करायचा नाही. पण कोणी जर अन्याय केला तर त्याला जागेवर ठेवायचं नाही ही आपली ओळख आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला सोपा मार्ग होता. तुम्हीही वॉशिंग मशिनमध्ये जाऊ शकला असतात. तुम्ही त्यातले नाहीयेत. तिकेड न जाता तुम्ही शिवसेनेत आलात, आता सर्व लढवय्ये शिवसैनिका आपल्यासोबत आहेत. आपल्याला फक्त पेणचाच नाही तर चांदा ते बांदा असा सत्तेत बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपण टीकत नाही असं म्हणतात पण आता आपल्याला शहाणपणाची सत्ता आणायची आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचे उद्योग आता चालणार नाहीत. पेणला येऊन मी जाहीर सभेत बोलेन असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

लवकरच सभा पुन्हा सुरू होणार

मधल्या काळात आपण सभा थांबवल्या होत्या, खारघर येथे दुर्घटना घडली, उन्हाळा होता त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने सभा थांबवल्या होत्या. पण मी सभा पुन्हा परत सुरू करतोय. २७ तारखेला मी हिंगोलीला जातोय, नंतर तुम्ही सगळे तारीख ठरवाल तेव्हा पेणला येऊन बोलेन असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

City Varta:-

गोवा बनावटीची दारू जप्त; सांगली, इचलकरंजीतील 5 जणांना अटक