नवऱ्याने वडापाव आणला, खायला घेणार तेवढ्यात बायकोला संशय अन्…

घरगुती वादामुळे पतीने पत्नीला आणि मुलाला मारहाण केली.(doubt) त्यानंतर वारंवार होत असलेले वाद कायमचे संपविण्यासाठी वडापावमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून पत्नी आणि मुलाला दिले. ही धक्कादायक घटना क्रांती चौक परिसरात घडली. या प्रकरणी उंदीर मारण्याचे औषध देणाऱ्या आणि त्याच्यासोबत चार जणांच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेच्या पतीचे आणि पतीच्या नातेवाइकांचे घरगुती कारणावरून वाद होत होते.(doubt) १६ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या दरम्यान महिलेचा पती शेख इसाक घरी आला. किरकोळ कारणावरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाले. या वादानंतर शेख इसाकने पत्नी आणि मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या घरातील सदस्य त्यांना सोडविण्यासाठी आले, तसेच त्यांनीही महिलेला शिवीगाळ केली.

यानंतर पतीने वडापाव आणला. या वडापावमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून वडापाव महिलेला खाण्यासाठी दिला. महिलेचा पती शेख इसाक याने आपले नातेवाईक शेख इब्राहिम, शेख युनूस, शेख याकूब, फुर खान, सर्व रा क्रांती चौक परिसरात यांच्या मदतीने संगनमत करून १३ ऑगस्ट रोजी रात्री वडापावमध्ये विष घालून पत्नी आणि मुलांना खाण्यासाठी दिले होते. वडापाव मधून वेगळाच वास येत असल्याचं निदर्शनास आल्यावर प्रसंगावधान राखत महिला आणि तिच्या मुलांनी वडापाव न खाता फेकून दिला, त्यामुळे ते बालंबाल वाचले.

या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात पती शेख इसाकसह शेख इब्राहिम, शेख युसूफ, शेख युनूस आणि फुरखान या पाच जणांच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

City Varta:-

गोवा बनावटीची दारू जप्त; सांगली, इचलकरंजीतील 5 जणांना अटक