सावळी येथील रस्त्यावर गोवा बनावटीच्या दारुची विक्री करणाऱ्या पाच जणांना राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने अटक केली.(Facilitator) पाच जणांकडून २ लाख ८९ हजार ९२० रुपयांच्या बनावट दारुसह तीन चारचाकी, दोन तलवारी असा असा एकूण २१ लाख ७९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दारुचा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार (Facilitator) यासीर शब्बीर मुजावर (वय ३०, साईनगर, कर्नाळ रस्ता सांगली), विशाल सुनील हेगडे (वय २९, रा. अहिल्यानगर, कुपवाड), महेश पुंडलिक पाटील (वय ३२, रा. वात्रेकर मळा, गंगानगर, इचलकरंजी), महादेव श्रीशैल्य व्हॅनमोरे (वय ३४, रा. कृष्णामाता चौक हरिपूर), वाशीम शबीर मुल्ला (वय २८, रा. अहिल्यानगर, सांगली) आणि योगेश विलास सरगर (वय २४ रो. कुपवाड एमआयडीसी, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाचे निरिक्षक राजकुमार खंडागळे यांच्या पथकास मिरज परिसरात काहीजण गोवा बनावटीच्या दारुची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी सावळी – कुपवाड रस्त्यावर सापळा लावला होता.
तेथे एक चारचाकी (एमएच १० सीआर ०६००) तसेच अन्य एका चारचाकीत (एमएच १० बीए ३२७२) काहीजण बसलेले आढळले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकातील लोकांनी चारचाकीची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना चारचाकीत गोवा बनावटी दारुच्या बाटल्याचे ३९ बॉक्स आढळून आले. संशयीतांकडे चौकशी केली असता त्यांनी ते विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान चौकशीत दारुचा पुरवठा करणारा मुख्य सुत्रधार यासीर मुजावर असून तो सध्या सांगली बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. याबाबत स्थानिक गुन्हे अन्र्वेषण शाखेस कल्पना देण्यात आल्याने त्यांच्या पथकाने घटनास्थळी जावून मुजावर यास अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या पाँच जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्ट अखेर पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.