भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर भारतीय क्रिकेट संघातील माजी दिग्गज क्रिकेटर सेहवागने सुद्धा क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला बराचकाळ लोटला आहे. पण आता या दोघांच्या कुटुंबातील पुढची पिढी क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी मेहनत करताना दिसतेय. विराट कोहलीचा भाचा आणि वीरेंद्र सेहवागच्या मुलाची दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मुलांचं नाव आर्यवीर आहे. विराटचा मोठा भाऊ विकास कोहलीचा मुलगा आर्यवीर कोहली हा 15 वर्षांचा असून वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग 17 वर्षांचा आहे. दोघांनी आगामी दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावासाठी नाव नोंदवलं आहे.
विराट कोहलीच्या भाच्याचं नाव आर्यवीर कोहली आहे. तो एक लेग स्पिनर आहे. आर्यवीर विराट कोहलीच्या लहानपणीचे कोच असून राजकुमार शर्माच्या अंडर वेस्ट दिल्लीमधील क्रिकेट अकादमीमध्ये ट्रेनिंग घेतोय. त्यालग मागच्या सीजनमध्ये दिल्ली अंडर 16 चा अधिकृत खेळाडू असल्याने श्रेणी सी मध्ये ठेवण्यात आलं होतं. दिल्ली क्रिकेटमध्ये, नोंदणीकृत खेळाडू असे असतात जे अंतिम 30 जणांच्या संघात स्थान मिळवतात.
या यादीत आर्यवीर कोहलीचं नाही तर दिग्गज क्रिकेटर वीरेंद्र सेहवागच्या मुलाच्या नावाचा सुद्धा सहभाग आहे. आर्यवीर सहवागचं वय सध्या 17 वर्ष असून त्याला सुद्धा ड्राफ्टमध्ये सामील करण्यात आलं आहे. दिल्ली अंडर-19 संघच प्रतिनिधित्व करणारा आणि मेघालय विरुद्ध 297 धावांची भागीदारी करणाऱ्या आर्यवीरला त्याचा छोटा भाऊ वेदांत सोबत श्रेणी बीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तो ऑफ-स्पिनर असून दिल्ली अंडर-16 संघाकडून खेळतो.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये या दोन्ही युवा खेळाडूंवर सुद्धा विशेष लक्ष असणार आहे. दिल्ली प्रीमियर लीगला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आता दोन्ही आर्यवीरला कोणते संघ करारबद्ध करतात हे पाहणं उत्सुकततेच ठरणार आहे.