आ. डॉ. बाबासाहेब देशमुख वारकरी बांधवांना देणार आरोग्यसेवा

वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रतील लाखो वारकरी (Warkari) पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. पायी वारीत वारकऱ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख ,डॉ. निकिताताई देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवार ,दि ३ जुलै व शुक्रवार , दि ४ जुलै रोजी वाखरी (ता. पंढरपूर) येथे वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा देणार आहेत.

आषाढी वारी ही महाराष्ट्रच्या सांस्कृतिक आणि आध्यत्मिक परंपरेचा गाभा आहे. वाखरी येथे पंढरीत जाण्यापूर्वी २५० किलोमीटर अंतर चालून थकलेल्या भाविकांची सेवा व वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः दोन दिवस रात्रंदिवस वारकऱ्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून वारकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोगयविषयक योजनांची माहितीही दिली जाणार आहे. खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीची वाट चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. निकिताताई देशमुख हे वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देणार असल्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.