२०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष. सर्व पक्ष आपापली मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असताना आपणाला पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शेट्टी आणि ठाकरेंच्या भेटीनंतर मुलरीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आगामी काळात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी तर आगामी काळात लोकसभेसाठी काही मतदारसंघात उमेदवारांची घोषणाही केली आहे.
तर काही ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. अशातच कोल्हापुरात (Kolhapur) मात्र, लोकसभेची उमेदवारी मागणं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला महागात पडलं आहे. कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शेट्टी आणि ठाकरेंच्या भेटीनंतर मुलरीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. नाराजी व्यक्त करत राजू शेट्टींना उमेदवारी देऊ नका, असं आवाहनही मुलरीधर जाधवांनी केलं होतं. त्यानंतर पक्षाकडून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांनंतर दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.