सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत “RUN FOR VOTE” या “लोकशाही मॅरेथॉन” चे आयोजन करण्यात आले आहे.”चला धावू या – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी” हे या लोकशाही मॅरेथॉनचे ब्रीद वाक्य असणार आहे.
कोल्हापूर शहरामधील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची जनजागृती, करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 7/4/2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे लोकशाही मॅरेथॉन होणार आहे.या लोकशाही मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना 3 कि.मी, 5 कि.मी, 10. कि.मी. अंतराचे पर्याय उपलब्ध होणार असून या मॅरेथॉनची सुरुवात व सांगता पोलिस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.
या वोट मॅरेथॉनमध्ये कोल्हापूर शहरातील विविध शासकीय, निम शासकीय, महामंडळे, राष्ट्रियीकृत बँका व सहकारी बँका, संस्था कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मतदार नागरिक यांनी मोठ्या संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी व्हावे तसेच, जे मतदार सहभागी होऊ शकणार नाहीत, त्यांनीदेखील धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
या लोकशाही मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून 24/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीमध्ये https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9 या लिंकवरती धावपटू नि:शुल्क नोंदणी करु शकतील.