राजारामपुरीत आज ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम!

शिवसेना ठाकरे गट आणि उत्तम उत्तुरे फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज गुरुवारी सात तारखेला होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे.राजारामपुरी ९ नंबर शाळेसमोर दुपारी चारला कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. खास महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आहे.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी होणाऱ्या कार्यक्रमात विविध खेळ, पारंपरिक खेळ आणि मनोरंजनातून बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. विजेत्यांना मानाच्या पैठणी देण्यात येणार आहेत. पार्श्वगायक प्रल्हाद पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे. महिलांना विविध शासकीय योजनांची माहितीही देण्यात येईल.