पंढरपुरात आज OBC एल्गार मेळावा…..

पंढरपूरमध्ये आज शनिवारी ओबीसी समाज बांधवांचा ओबीसी एल्गार मेळावा पार पडणार आहे. यासाठी पंढरपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ओबीसींच्या या विराट एल्गार मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येनं ओबीसी समाज उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, लक्ष्मण गायकवाड, विजय चौगुले आदींसह ओबीसी समाज घटकातील मान्यवर आणि ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.