खानापूर मतदार संघाचे आमदार आ. अनिल बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

खानापूर मतदार संघाचे आमदार आणि टेंभू योजनेचे जनक अनिल भाऊ बाबर यांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी टेंभू गावातून कृष्णा नदीचे पाणी उचलून दुष्काळी भागाला दुष्काळाच्या शापातून मुक्त करण्याचे स्वप्न पाहिलं. नुकतेच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने टेंभू योजनेची तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन खानापूर मतदारसंघातील उर्वरित सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश केला आणि आमदार बाबर यांच्यासह सर्वच नागरिकांनी स्वप्नपूर्तीचा आनंद उत्सव साजरा केला.

आज रविवारी म्हणजेच ७ जानेवारीला आ. अनिल बाबर यांचा वाढदिवस आहे. आमदार अनिल बाबर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

खानापूर, आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात रविवार, दि. ७ रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात खानापूर – आटपाडी मतदारसंघातील शेतकरी, जनता आणि कार्यकर्त्यांच्यावतीने आमदार बाबर यांचा सत्कार होणार आहे.विस्तारित टेंभू योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे खानापूर, आटपाडी तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणारा भाग ओलिताखाली येणार आहे.

दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले आहे.त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मतदारसंघातील जनतेकडून कृतज्ञता म्हणून आमदार बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार होणार आहे. मतदारसंघातील गावा- गावात बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.