वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीवर गुरु ग्रहाची अधिपती आहे. गुरु हा वृद्धी, समृद्धी, ऐश्वर्य, ज्ञान आणि गूढ विषयांचा कारक मानल जातो. 2024 पासून धनु राशीच्या पारगमन कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहता चढत्या घरात तुमच्या संक्रमण कुंडलीत मंगळ आणि सूर्य असणार आहे. जे लोकांसाठी खूप चांगले ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 2024 हे वर्ष धनु राशीसाठी कसे असणार आहे.
व्यवसाय
2024 हे वर्ष नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. या वर्षी तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात फायदासोबत प्रगती होणार आहे. केतू तुम्हाला चांगला लाभ देणार आहे. पण कधी कधी राहु ग्रह तुम्हाला खूप मेहनत करायला लावणार आहे. काही प्रमाणात तुमची धावपळही होण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप प्रवास देखील करु शकता. तसंच, या वर्षी नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे.
आर्थिक स्थिती 2024
2024 मध्ये तुमची आर्थिक स्थिती 2023 पेक्षा चांगली असणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे चांगले स्त्रोत मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत लाभणार आहे. नोकरीत चांगली पगारवाढ होणार आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.
करिअर आणि शिक्षण 2024
2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे. कारण गुरु पाचव्या घरात असल्यामुळे मे महिन्यापर्यंत तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश निश्चित करु शकणार आहात. स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 1 मे पूर्वी परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, त्यांना संधी मिळणार आहे.
वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ सिद्ध होणार आहे. यावर्षी कोणतीही अडचण तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे, त्यांना 1 मे पूर्वी तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे.
आरोग्यविषयक
2024 मध्ये तुम्हाला आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या होणार नाही. त्याच वेळी, या वर्षी तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळणार आहे. पण हो, थोडं बाहेरचं खाणं तुम्हाला टाळावं लागणार आहे. अन्यथा, काही महिन्यांत तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना होऊ शकते.
धनु राशीसाठी उपाय 2024
मे नंतर, गुरु तुमच्या राशीच्या सहाव्या भावात असणार आहे. त्यामुळे तुम्ही गुरूशी संबंधित उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल. गुरुवारी मंदिरात हरभरा डाळ आणि केळी दान करणे फायद्याच ठरले. शिवाय तुम्ही पिवळ्या मिठाईचे दानही करु शकता. त्याशिवाय पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गोळा बांधून वर्षभर हातात बांधून ठेवा. तसंच अनावश्यक खर्च टाळा.