सांगोल्यात भानवसे दाम्पत्य ठरले महाराष्ट्राचा फेवरेट रीलस्टार!

नुकताच माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषाला साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन सांगोला तालुक्यात आयोजित केलेले होते. यांच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्राम या सोशल माध्यमातून फेवरेट रीलस्टार ही अनोखी आणि सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.

या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी सोशल मीडियाचा वापर वस्तुस्थितीचे दर्शन घेण्यासाठी कसा करावा याचे चित्रण दाखवून दिले. या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. तर महाराष्ट्राचा फेवरेट रील स्टार स्पर्धेत राज्याचा पहिला रीलस्टार पंढरपूर येथील पूजा भानवसे आणि विनायक भानवसे हे दाम्पत्य ठरले.

त्यांना 71 हजार रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफी देखील देण्यात आली. या दाम्पत्याने माजी आमदार दीपक आबांनी केलेल्या सत्य घटनेवर भावनिक रील बनवले होते आणि हेच रील सोशल मीडियावर लाखो लोकांच्या पसंतीस उतरले होते.