आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि २९ ऑगस्ट २०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात वातावरणात झाली. खेळीमेळीच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्री प्रबुद्धचंद्र चंद्रशेखर झपके सर यांनी उपस्थित सर्व सन्माननीय सभासदांचे स्वागत केले.

त्याचबरोबर मागील आर्थिक वर्षात संस्थेची संचालक मंडळाची २०२३-२८ साठी बिनविरोध निवड झाली असुन चेअरमन श्री.प्रबुद्धचंद्र झपके सर यांची तर व्हा. चेअरमनपदी अॅड. उदय घोंगडे यांची निवड झाली असल्याबद्दल सांगितले. सर्व सभासदांतर्फे टाळ्यांच्या गजरात नवीन संचालकांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. यानंतर संस्थेचे सचिव श्री. निलेश बाळकृष्ण ताकभाते यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचन करून नफा विभागणी, आर्थिक वर्ष २०२२-२३ चा अहवाल, लेखापरिक्षण किरकोळ दोष दुरूस्ती, थकबाकी तसेच पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक याबाबत सविस्तर माहिती दिली. वरील सर्व विषयांवर सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षांनी सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन शंका निरसन केले. तसेच पतसंस्थेस मागिल आर्थिक वर्षात ‘अ’ वर्ग प्राप्त झाला असल्याबाबत सांगितले. तसेच दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या नियमित कर्ज फेड करणाऱ्या कर्जदाराचा व्याजातील सूट रकमेचा धनादेश, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदर्श कर्जदार म्हणून सत्कार संस्थेचे नुतन संचालक श्री. सुहास होनराव यांनी केला. वार्षिक सर्वसाधारण सभेस लेखापरिक्षक मा. श्री. मणेरी आय. ए. उपस्थित होते.

त्यांनी उपस्थित सभासदांना सहकार व सहकार कायदा बाबद मार्गदर्शन केले. अहवाल काळात श्री मणेरी साहेबांचे संस्थेला मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल संस्थेचे सचिव यांनी त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर सभासदांना १३ टक्के डिव्हिडंड व दिवाळी भेटवस्तु वाटप करण्याचे सर्वानुमते ठरले. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शेवटी संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. श्री. उदय घोंगडे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.