राममंदिर प्राणप्रतिष्ठा, शिवजयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा……

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. याआधी आनंदाचा शिधा हा दिवाळी, दसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जात होता.