१४ जानेवारीपासून सुरू होणार हा सेल…

फ्लिपकार्टचा १४ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनी सेल सुरू होणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाइट आणि अॅप्सवर या सेलची झलक दाखवलीय. या टीझरमध्ये तुम्ही पाहिलं असेल मोठं-मोठ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्सची किमत कमी झालीय.मोबाईल्सच्या किमतीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आलीय. टीझर पेजवर दाखवल्याप्रमाणे हा सेल १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

फ्लिपकार्टने अद्याप सर्व फोनच्या किमती जाहीर केलेल्या नाहीत. मात्र कोणते फोन स्वस्तात मिळतील हे सांगितले आहे. या सेलमध्ये Apple च्या सर्व iPhone 15, 14, 13, 12 वर डिस्काउंट असेल.

तसेच Google Pixel 7a, Samsung Galaxy S21 FE 5G, Motorola Edge 40 Neo, Samsung Galaxy S22, Pixel 8, Vivo T2 Pro, Oppo Reno 10 Pro, Vivo T2x, Poco X5, Realme 11, Redmi 12, Samsung Galaxy F34 5G आणखी बरेच फोन कमी किमतीत उपलब्ध असणार आहेत.

हा सेल सुरू होण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत. पण फ्लिपकार्ट १४ जानेवारीपूर्वी किंमती जाहीर करेल, अशी शक्यता आहे. या सेलमध्ये iPhone 15 सारखे फोन्सची किमत कमी करण्यात आलीय. यामुळे आयफोन लव्हर्ससाठी हा सेल आनंदाचा असणार आहे.

सेल सुरू होण्यापूर्वीच बेस 128GB स्टोरेज मॉडेल फ्लिपकार्टवर ७२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला भारतात आयफोन १५ किमत ७९,९९० रुपये होते. या सेलमध्ये ग्राहकांना या फोनच्या किमतीमध्ये तब्बल ६,९०१ रुपयांची सूट मिळू शकते.