कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात बॉम्ब…..

प्रत्येक बस स्थानकावर आपणाला गर्दी झालेली ही पाहायला मिळते. कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकावर देखील आपल्याला खूपच गर्दी दिसतेच आणि याच गर्दीमध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात सायंकाळी एकच खळबळ उडाली.

मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची फुल गर्दी असतानाच मुंबई पुणे फलकावर बॉम्ब असल्याची खबर सगळीकडे पसरली आणि यामुळेच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.एकच तारांबळ प्रवाशांमध्ये पाहायला मिळाली.

बॉम्बसदृश्य वस्तू असल्याची माहिती ज्यावेळेस एसटी प्रशासनाला मिळाली त्यावेळेस याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाला तसेच रुग्णवाहिकेला देखील कळविण्यात आले. काही क्षणातच पोलीस कर्मचारी अधिकारी दाखल झाले त्याच्या पाठोपाठ लगेच श्वान पथक देखील हजर झाले.

बॉम्बसदृश्य वस्तूचा शोध घेण्यास सुरुवात झाली. श्वानान बेवारस बॅगा शोधल्या. त्याच्यापाठोपाठ असलेल्या बॉम्ब पथकाने आत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने एका बेवारस बागेची तपासणी केली. त्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडली. या सर्व प्रकारांमध्ये प्रवाशांमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. परंतु प्रत्यक्षात हा पोलिसांचा मोकट्वील असल्याचं स्पष्ट झालं