खराब रस्त्यावरून ना. मुश्रीफ यांनी कोल्हापूर मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांना झापले

आपल्याला कमिशन यायचे बाकी आहे कमिशन मिळाले नाही म्हणून काम थांबले का? रस्ते करण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत मग कामे का झाली नाही? दिवाळीपूर्वी खड्डे मुजवा म्हणून मी सांगितले होते. ते का झाले नाही? आयुक्तांना आयुक्त राहण्यात इंटरेस्ट आहे की कलेक्टर होण्यात आहे हे मला माहीत नाही. कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री हसनमुस्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

रस्ते नीट नसल्याने नागरिक पालकमंत्र्यांनवर टीका करत आहेत, अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातून कसरत करत वाहनधारक आपला मार्ग काढत आहेत. कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक येत असतात.

मात्र, कोल्हापूर शहरात प्रवेश केला की, खड्ड्यांचा सामना भाविकांना आणि कोल्हापूरकरांना करावा लागतो. हाडे खिळखिळी करणारे हे खड्डे मुजवण्यासाठी व नवीन रस्ते तयार करण्यासाठी शासनाकडून १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप देखील खड्डेमुक्त रस्ते महानगरपालिका उदासीन असलेली पहायला मिळत आहे.

यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापूरकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून खराब रस्त्यांवरून आता त्यांना जाब विचारला जाऊ लागला आहे. यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना चांगलेच झापले.