अयोध्या में राम आयेंगे! दारू, चिकन, मटण शॉप बंद….

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. हा दिवस संपूर्ण देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार असून यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे

. या सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशातही दिसत असून पुणेकरही यासाठी सज्ज झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक महत्वाची मागणी करण्यात आली आहे. 22 जानेवारीला पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासे शॉप दुकान बंद ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघर्ष सेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली आहे.22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा उत्सव देशभर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.

त्यामुळे 22 तारखेला देशामध्ये उत्साहाचं, आनंदी वातावरण रहावं. यामुळे सर्व मद्यविक्री तसेच मटण, चिकन, मासेविक्री दुकानं एका दिवसासाठी बंद ठेवावी अशी मागणी संघर्ष सेनेने पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा अधिकारी, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.