उद्धव ठाकरे यांना धक्का…..

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. आमदार रवींद्र वायकर यांची अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी केलेल्या चौकशीनंतर आता दुसऱ्या आमदाराची चौकशी सुरु झाली आहे. शिवसेना उपनेते आणि आमदार डॉ राजन साळवी यांची चौकशी सुरु झाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) ही चौकशी गुरुवारी सकाळी सुरु करण्यात आली. या चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी रत्नागिरी आणि रायगड येथील एसीबीचे पथक पोहचले. रत्नागिरी आणि रायगड कार्यालयातील अधिकारी आले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु केली आहे.चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास आहे.

आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. मी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले.