मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध आगामी ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी सुरू झालं आहे. यावेळी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटाची टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. तर सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभळली आहे. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत