इस्लामपूरमध्ये राममूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने कार्यक्रमांची रेलचेल

22 जानेवारी रोजी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या निमित्ताने आगामी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.अक्षता कलशाची गावोगावी मिरवणुक निघाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीने आता मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहुर्त साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लामपूरमध्ये लाल चौकातील महादेव मंदिरामध्ये ३ हजार महिला तिरंगी साड्या परिधान करून महाआरती करणार आहेत. तर भाजपच्यावतीने शहरात दि. २२ जानेवारी रोजी महाआरती व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरात विद्युत रोषणाई व भगवे ध्वज, भगव्या पताका लावून शहर भगवेमय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.