प्रत्येक स्वयंपाकघरात लसूण हा पदार्थ सहजतेने सापडतो. मुळात लसणाचा हा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात असल्याने जेवणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण लसणाचे हेच महत्त्व कालांतराने कमी होताना दिसत आहे. कारण कांद्यानंतर लसणाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहातून लसणाचे फोडणी गायब झाली आहे. परिणामी शेतरकऱ्यांना लसून हसवतोय तर कांदा रडवतोय अशी अवस्था झाली आहे.
गेल्या कितेक महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत असताना दिसून येत आहे. उत्पादनाअभावी बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसणाच्या दरात सतत वाढ सुरु आहे. आता लसणाची किंमत 80 ते 100 रुपये किलो असून लसून घाऊक बाजारात 200 ते 350 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाची किंमत 400 रुपयांच्या घरात गेला आहे.
नेहमी 80 ते 100 रु. प्रतिकिलो असणारा लसणाचा भाव हा 100 रुपये किलोंपासून वाढत आता 400 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. लसूण पिकासाठी पाणी जास्त प्रमाणात लागते. मात्र यंदा पाण्याची कमतरता असून लसूण पिकण्याचा कालावधी चार महिन्यांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लसून लागवडीकडे शेतकरी कमी वळले होते.
यावेळी लागवडीसाठी लसणाचे बेण्याचे दर जास्त होते. परिणामी शेतकऱ्यांनी लसून लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. नवीन लसूण बाजारात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागू शकतो. बाजारात लसणाची आवक नसल्याने किरकोळ बाजारात हायब्रीड लसणाचा भाव 200 ते 300 रुपये किलो, तर गावरान लसणाचा दर 400 रुपये किलोवर पोहोचला आहे.