मुंबई मध्ये रोड शो नंतर आता दादर च्या शिवाजी पार्क मैदानामध्ये आज 17 मे दिवशी महायुती ‘जाहीर सभा’ घेणार आहे. या सभेच्या मंचावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार आहेत त्यामुळे या सभेबाबत कमालीची उत्सुकता आहे.सभेच्या निमित्ताने अनेक VVIPs ची ये जा असल्याने मोठी वाहतूक कोंडी होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाकडून ट्राफिक मध्ये काही बदल केले आहेत. ही नियमावली 16 मे रात्री 10 वाजल्यापासून 17 मे च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे.
नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मनसे कडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचा लोकसभा निवडणूकीमध्ये उमेदवार नसला तरीही महायुतीला त्यांचा बिनशर्त पाठिंबा आहे.