सोमवारपासून राज्यस्तर खो-खो स्पर्धा….

अलीकडे अनेक गावोगावी अनेक प्रकारचे उपक्रम, तसेच योजना, स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. तसेच अनेक मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत. खो-खो असोसिएशन व शिवप्रेमी मंडळातर्फे भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सोमवारपासून कुपवाडमध्ये सुरू होत आहेत. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत ४० संघांचा सहभाग आहे. आमदार सुधीर गाडगीळ व नगरसेवक गजानन मगदुम यांनी ही माहिती दिली. याचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी वाजता अकूज ड्रिमलँडच्या न मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार . यांच्याहस्ते होईल.

यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार संजय पाटील, भाजपा नेते शेखर इनामदार आदी उपस्थित राहणार आहेत. पुरुष व महिला गटाचे प्रत्येकी १२ संघ व किशोर गटाचे प्रत्येकी ८ संघ सहभागी होतील. विजेत्यांना एकूण २६ लाख ३४ हजाराची रोख बक्षिसे आणि भाई नेरूरकर चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. चार क्रीडांगणांवर सामने होतील.