सध्या मराठा आरक्षण मुद्दा खूपच वाढत आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुंबई आंदोलनावरून सोशल मीडियातून मनोज जरांगे यांच्यावर टीका होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांविरोधात मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार असून, यासाठी जरांगे आजपासून 10 फेब्रुवारीपर्यत महाराष्ट्र दौरा करणार आहे. मनोज जरांगे हे आज आळंदी आणि मुंबई असा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. यासाठी आज आंतरवाली सराटीवरून 12 वाजता ते निघणार आहेत. याच दौऱ्यात मुंबईतील मराठा समाजबांधवांसोबत ते बैठक देखील घेणार आहे.
6 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे आंतरवालीहून 12 वाजता निघणार. शिक्रापूर मार्गे- चाकण आळंदी देवाची, आळंदी येथे नियोजित कार्यक्रमला सायंकाळी 6 वाजता हजेरी लावणार. तसेच आळंदी मुक्काम. 7 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे आळंदीहून चाकण मार्गे- खोपोली मार्गे- पनवेल मार्गे- कामोठे येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार. त्यानंतर नवी मुंबई मार्गे- चेंबूर मार्गे- शिवाजी मंदिर, दादर मुंबई येथे सायंकाळी 6 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार.
8 फेब्रुवारी 2024 : दादर मुंबईतून – नाशिक मार्गे- सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रम. त्यानंतर सान्हेर किल्याहुन छत्रपती संभाजीनगर मार्गे- आंतरवाली सराटी. 9 फेब्रुवारी 2024 : आंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर भोगलगावहून – बीड मार्गे- कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी 12 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर कोळवाडीहून बीड – गेवराई मार्गे – आंतरवाली सराटी..10 फेब्रुवारी 2024 : आंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता महत्वाची बैठक व त्यानंतर मनोज जरांगे पाटिल यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.