सांगोला तालुक्यातील शेतकरी खंडित वीजेमुळे त्रस्त….

सांगोला हा तालुका दुष्काळ भाग म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. तीव्र पानीटंचाई या तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाण्याअभावी येथील नागरिकांचे खूपच हाल होत राहतात.

सांगोला तालुक्यात वीजपुरवठा अलीकडच्या काळामध्ये सतत खंडित केला जात आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटार व शेती उपयुक्त साहित्य तसेच घरगुती साहित्य हे जळत आहे. त्यामुळे वीज वापरणाऱ्यांचे खूप मोठे नुकसान सांगोला तालुक्यातील नागरिकांचे होत आहेत.

त्यामुळे वीज मंडळाच्या गलथान कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.भूगर्भातील पाण्याची पातळी ही खालावली आहे. सध्या काही भागांमध्ये शेतीसाठी आठ तास तर काही भागांमध्ये चार तास वीज पुरवठा हा केला जातो.

परंतु हा वीज पुरवठा सतत खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी एक शेतकरी तर वारंवार वीज जात असल्याने मोटारीच्या पेटीजवळ एक शेतकरी अशी अवस्था झालेली आहे.