दरवर्षीप्रमाणे कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला सांगोला शहर तसेच तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळालेला असून हजारो महिलांनी या स्पर्धेत भाग घेतलेला होता.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या शनिवारी 28 सप्टेंबरला सांगोला शहरातील मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स येथे सकाळी 11 वाजता आयोजित केला असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेली आहे.