सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला टेम्भू, म्हैसाळसह आता 884 कोटी रुपयाची बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सांगोला येथे विराट वचनपूर्ती सभेचे आयोजन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले होते.
यावेळी सांगोला तालुक्यातील महूदपासून सांगोल्यापर्यंत खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar), शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आणि दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांची विराट रॅली काढण्यात आली. या मार्गावर ठिकठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने नेत्यांवर फुलांची उधळण करण्यात आली.
या रॅलीसमोर 100 पेक्षा जास्त हलग्यांच्या कडकडाट करीत प्रत्येक गावात या रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी रॅली सांगोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभास्थानी पोचली. त्यामुळे या सभेतून लोकसभेचा नारळ फोडण्यात आल्याची देखील चर्चा आहे.