आज कोल्हापुरात अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

वंचित शेतकऱ्याना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशी मागणी होती. 70 हजारांहून अधिक शेतकरी या योजनेपासून वंचित होते, त्यांना आम्ही मदत करण्याचे ठरविले आहे, लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेपूर्वी प्रोत्साहन अनुदान 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात केली. पाण्याचे दर कमी करावेत अशी शेतकऱ्याची मागणी होती, आम्ही ते दर कमी करून पूर्ववत केली आहेत, असेही ते म्हणाले.  

अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि गडहिंग्लज दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा नागरी सत्कार तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्याकडून चंदगड नगरपंचायतीला 10 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला. घड्याळ तेच पण वेळ नवी असे धोरण ठरवून आम्ही काम करत आहोत. कायदा सुव्यवस्थेचा बाबतीत विरोधक आरोप करत आहेत, अशा घटना घडत आहेत, पण या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत. कोणी मोठ्या बाबाचा असला, तरी कायदा आणि संविधान सर्वश्रेष्ठ आहे. दादागिरी आणि गुंडगिरीला बळी पडू नका, असेही ते म्हणाले.