वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी मध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी नागरिकांची वनवन देखील होते. तसेच सततच्या पाईपलाईन गळतीमुळे खूप दिवस आड इचलकरंजीला वाट पहावी लागते. परंतु महापालिका प्रशासनाने या गळतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून इचलकरंजी शहराला सुरळीत पाण्याचा पुरवठा चालू केलेला आहे.
इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला सतत गळती लागत असते. कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागून अनियमित पाणीपुरवठा होत होता. परंतु पातळीवर केल्याने शहरात पाणीपुरवठा झाला आहे सध्या काही भागात दोन दिवसात तर काही भागात तीन दिवसात पाणीपुरवठा होत आहे लवकरच सर्वच भागात दिवसात पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आलेले आहे.