रोमन फेस्टिव्हलपासून व्हॅलेंटाइन डेची सुरुवात झाली. जगातील पहिला व्हॅलेंटाईन डे 496 मध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर, 5 व्या शतकात, रोमचे पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस रोमसह जगभरात मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे. तुम्हीसुद्धा एखाद्यावर प्रेम करत असाल तर आणि ते व्यक्त कराचे असेल तर, उद्याचा दिवस अत्यंत योग्य आहे. उद्या जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. या निमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला वैलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्या.
‘वैलेंटाईन डे’च्या मराठी शुभेच्छा
तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशील
Happy Valentines Day!
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू…
Happy Valentines Day!
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
Happy Valentines Day!