येत्या आठवड्यात टेंभू योजनेतून सांगोला कालव्यात पाणी

सांगोला हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई खूपच जाणवते. येत्या आठवड्यामध्ये शेती पिके तसेच पिण्यासाठी टेंभू योजनेतून सांगोला कालव्यामध्ये सुमारे 90 दलघgफूट पाणी सोडण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी पाण्याची नासधूस न करता पाण्याचा वापर योग्य आणि काटकसरीने करावे असे आवाहन पाटबंधारे शाखा जुनोनी यांच्या वतीने केलेले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने शेती पिके करपू लागल्याने तसेच जनावरे व पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने टेंभू उपसा सिंचन योजनेतून सांगोला कालव्यामध्ये पाणी सोडण्याचे नियोजन केलेले आहे.