लेखी आश्वासन नाही तोपर्यंत सायझिंग बंदच……

इचलकरंजी येथील प्रदुषणाच्या कारणावरून प्रदुषण नियंत्रण मंडळाने शहरातील पाच सायझिंगांना क्लोजरची नोटीस बजावली आहे. तर चार सायझिंगचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. जे उद्योग प्रदुषणास कारणीभूत ठरत आहेत त्यांच्यावर कारवाई न करता सायझिंग व्यवसायाचा नगण्य विसर्ग असताना त्यांच्यावर कारवाई करत दुजाभाव करीत असल्याने सायझिंग असोसिएशनने प्रदुषण नियंत्रण मंडळ जोपर्यंत सायझिंग रिस्टार्टचा निर्णय जाहीर करीत नाही तोपर्यंत सायझिंग बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामध्ये शहर परिसरातील सुमारे १५० सायझिंग शुक्रवार ता.९ पासून बेमुदत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे दररोजी २५ ते ३० कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने सायझिंगना क्लोजरची नोटीस तसेच वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्षेधार्थ सायझिंग बेमुदत बंदच्या पार्श्वभुमीवर मुंबई येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये सायझिंग रिस्टार्ट तसेच दंड आणि व्याज परत देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला. दरम्यान, निर्णयासंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय सायझिंग सुरू न करण्याचा निर्धार दि इचलकरंजी सायझिंग को. ऑप.च्यावतीने घेतला आहे.