आज 14 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. त्यातच इश्काचा जसा लाल तसाच आपल्या रक्ताही रंग लाल तुम्हालाही वाटले असेल हे वाक्य इथे का? तर 2019 मध्ये झालेला पुलवामा अटॅक तुमच्या लक्षात असेलच. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा अटॅकमध्ये देशाला मिळालेला सगळ्यात मोठा धक्का होता. त्यामुळे 14 फेब्रुवारी या दिवसाला काळा दिवस मानला जातो.
आज या दिवसाला पाच वर्षे पूर्ण झाली.जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्हात झालेला हा हल्ल्यात देशातील 40 जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारीला प्रत्येकजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत असला तरी, या 40 हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी हा दिवस अजूनही काळा दिवस आहे. काहींनी पती गमावला, काहींनी भाऊ तर काहींनी म्हातारपणाचा आधार. पुलवामा येथे एका आत्मघाती बॉम्बरने CRPFच्या ताफ्याला निशाना केले, परिणामी 40 शूर जवान शहीद झाले.
हल्ला झाला तेव्हा 2,500 हून अधिक सैनिकांचा ताफा सुट्टीवरून परतत होता किंवा तैनातीच्या ठिकाणी जात होता.यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, अशी शपथ घेतली. सुरक्षा दलांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ, ठिकाण आणि पद्धत निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद (JeM) तळावर हवाई हल्ले केल्यानंतर बारा दिवसांनी ही घटना घडली आहे.
पुलवामा हल्ल्याचा देशभरात निषेध झाला. JeM म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. यात भारताला यशही आले. 1 मे 2019 रोजी अझहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले.पुलवामा हल्ल्यामागील कटाचा पर्दाफाश करण्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, इलेक्ट्रॉनिक पुरावे, दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांच्या साक्षीच्या आधारे अझहरसह 19 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या हल्ल्याला पाच वर्षे उलटून गेली तरी त्याच्या भयानक आठवणी अजूनही ताज्या आहेत.