भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. तेव्हापासून, दरवर्षी भारत हा खास दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या वर्षी भारत आपला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. हा दिवस आपल्या भारतीयांसाठी देखील खास आहे कारण जेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटीश राजवटीपासून स्वतंत्र झाला, तेव्हा आपले स्वतःचे संविधान नव्हते आणि देशाचे संविधान ही त्याची ओळख असते. एक राष्ट्र म्हणून, आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी ती ओळख मिळाली होती. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले की, गुलामगिरीच्या साखळ्या तोडून भारत पूर्ण क्षमतेने प्रगतीच्या मार्गावर कसा पुढे जात आहे.
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला…!
!!!…प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!