इस्लामपूरचे काँग्रेसनिष्ठ महाडिक घराणेही आता भाजपवासी झाले आहे. आता जिल्ह्यातील दहा तालुक्यांत केवळ दोन ते तीन ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही गळती लागली आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan Resigns) यांच्यापाठोपाठ जिल्ह्यातून कोण काँग्रेसला रामराम करणार, याबाबत आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे. सांगलीत विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यावर तातडीने खुलशांवर खुलासे करीत आहेत. याआधीच काँग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये गेले आहेत.
आता आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत आणि विशाल पाटील या युवा चेहऱ्यांकडे भाजपचे लक्ष आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतही संशयाचे वातावरण आहे.