शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (Scholarship Exam) जिल्ह्यातून ३१ हजार ६०३ विद्यार्थी (Students) बसणार आहेत.यामध्ये पूर्व उच्च प्राथमिकचे (पाचवी) १९ हजार १३४ व पूर्व माध्यमिकचे (आठवी) १२ हजार ४६९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेसाठी केवळ ३८ टक्के नोंदणी झाली आहे.
रविवारी (ता. १८) होणार आहे. जिल्ह्यात ८३ हजार विद्यार्थी संख्या असून ५१ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविली आहे.यंदाच्या परीक्षेला निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते.
पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवीसाठी होती. मात्र काही वर्षांपासून यात बदल करून ती पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येत आहे. यामध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी ६० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.