सध्या अनेक नेतेमंडळींचे पक्षांतर चालू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. खासदार संजय पाटील यांचे निष्ठावंत कट्टर समर्थक सचिन गणपतराव पाटील यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना तासगाव तालुका अध्यक्ष पदाचे पत्र देण्यात आले. खासदार पाटील गटाला हा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) मधे तासगाव तालुक्यात प्रवेश होत आहे. काही पदाधिकारी ही निवडण्यात आले आहेत मात्र तासगाव तालुका अध्यक्ष निवड झालेली नव्हती, आज त्याला मुहूर्त लागला. मांजर्डे येथील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेसमधे प्रवेश केला.