देशात यंदा गव्हाच्या पेरणीत वाढ झालेली आहे. सोबतच अनुकूल हवामानामुळे यावर्षी देशात विक्रमी ११.५ कोटी टन गव्हाचे उत्पादन होऊ शकते. ते आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन ठरू शकते.पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे.
मात्र, अवकाळी पावसामुळे तुरीला फटका बसल्याने उत्पादन कमी झालेले आहे. त्यामुळे तूर डाळीच्या दरात सतत वाढ होत असून ते नवा उच्चांक गाठू शकतात. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयांच्या पार जाण्याचे संकेत आहेत.