राज्यातील बैलगाडा प्रेमींवर आठवडाभरात दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं.त्यानंतर आज पुन्हा एकदा बैलगाडाप्रेमींच्या कानावर दु:खद बातमी आली आहे.
बैलगाडा शर्यत घाटांवर आधिराज्य गाजवणारा हिंदकेसरी मन्या बैलाचं निधन झालं आहे. मन्याच्या निधनानंतर बैलगाडा मालकांमध्ये आणि बैलगाडा प्रेमींमध्ये शौककळा पसरली आहे. यावेळी बैलगाडा मालक राजू जवळेकर यांनाही अश्रू अनावर झाले.पोटच्या लेकराप्रमाणे जपलेला मन्याने मालकाला वेगळी ओळख निर्माण दिली होती. मन्या प्रत्येक घाटाचा मानकरी ठरला होता. मन्याच्या अंत्यविधीला मोठी गर्दी उसळली होती.