महायुतीत शिवसेनेचा निर्णय ठरला इतक्या जागांवर निवडणूका….

 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. या संदर्भात सोमवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकमत झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उरलेल्या ४ जागांचे भविष्य ठरवण्याचे अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय शिवसेनेच्या संसदीय पक्षाने घेतला आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय एकमताने झाला. सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा जिंकल्या होत्या. त्यातील १८ जागांवर उमेदवार देण्याची शिवसेनेने तयारी सुरु केली आहे.

जागावाटपाची चर्चा करण्याचे अधिकार पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातील खासदार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.