कोयना धरणातील पाणी अखेर सांगलीत दाखल…

सध्याच्या परिस्थितीत पाणीटंचाईमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते .वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा वाढला आहे.कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी कमी झाल्याने कृष्णा नदीपात्र कोरडे पडले होते त्यामुळे शहराला अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे .आठ दिवसापूर्वी सोडलेले पाणी अखेर आज सांगलीत आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे आणि टंचाईच्या समस्या काही प्रमाणात कमी होणार आहेत. यंदाच्या हंगामात पाऊस कमी प्रमाणात झाला आहे .त्याशिवाय कोयना धरणातून अपुरा पाणीसाठा आहे .गेल्या पंधरा दिवसापासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढलेली आहे त्यातच नदीतून उपसा वाढलेला आहे. कोयना धरणातून पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले आहे