महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप……

जून 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. विधानपरिषद निवडणुकीनंतरच शिवसेनेत फूट पडली आणि राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पुन्हा कोसळलं, यानंतर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका होणार आहेत.

यावर्षी मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या पक्षातील मिळून विधानपरिषदेच्या 22 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे, यापैकी काल गुरूवारी 10 आमदारांचं शेवटचं अधिवेशन होत. या 10 आमदारांचा निरोप समारंभही विधिमंडळात होणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचं समीकरण बदललं आहे. विधानसभेचे आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करतात, त्यामुळे विधानपरिषदेत पुन्हा वर्णी लागण्यासाठी अनेक आमदार पक्षांतर करण्याची शक्यता आहे. अपात्रतेची टांगती तलवार असलेले अनेक आमदार या यादीत असल्याने हा मुद्दा निकाली काढला जाईल.