एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा!अन्यथा गणेशोत्सव काळात……

येत्या ०३ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेशोत्सव काळात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन (ST Workers Strike) करण्याच्या तयारीत आहेत. राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

एस. टी. कर्मचारी कृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला गंभीर इशारा देण्यात आला असून एस. टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास गणेशोत्सवकाळात (Ganeshotsav 2024) प्रवाशांचे होणार हाल होणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं. या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन इशारा देण्यात आला आहे. 3 सप्टेंबरनंतर गणेशोत्सव सुरू होत आहे.

मात्र या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचा मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.