तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून पक्कं झाल्याची माहिती आहे.
याचे संकेत खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. शाहू महाराजांसाठी आम्ही ही जागा राखून ठेवली आहे. मात्र ते कोणत्या चिन्हावर लढतील याचा हे तूर्त आता तरी सांगता येणार नाही. आमच्याकडे मशाल, हात, तुतारी असे तिन्ही पर्याय आहे, असे पटोलेंनी सांगितले.
