IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी ‘या’ खेळाडूची…..

आयपीएल 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे यंदा 17 व्या हंगामातील 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या 17 दिवसांमध्ये एकूण 21 सामने पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ किमान 3 आणि जास्तीत 5 सामने खेळणार आहे. या हंगामासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने अनेक खांदेपालट सुरु आहे. अशात अशीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. एसआरएच अर्थात सनरायजर्स हैदराबाद टीमने नव्या कर्णधाराची घोषणा सोशल मीडियावरुन केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू पॅट कमिन्स याच्याकडे या 17 व्या मोसमासाठी सनरायजर्स हैदराबाद टीमच्या कर्णधारपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.एडन मारक्रम याच्याकडे गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबाद टीमची धुरा होती. मात्र आता मारक्रम याची उचलबांगडी करत पॅटला जबाबदारी दिली आहे. मारक्रमने आपल्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये चॅम्पियन केलं होतं. मात्र त्याला कॅप्टन म्हणून आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. एसआरएचला 16 व्या हंगामात एडनच्या नेतृत्वात एसआरएचला 14 पैकी फक्त 4 सामनेच जिंकता आले. त्यामुळे आता एडनच्या जागी पॅटला जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी डिसेंबर 2023 मध्ये मिनी ऑक्शन पार पडलं. सनरायजर्स हैदराबादने पॅटला या ऑक्शनमध्ये 20 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा ठरला. मिचेलसाठी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाख रुपये मोजले.