सध्या खूपच पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. कारण यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याच्या समस्येला सर्वाना सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात पाण्यासाठी खूपच वणवण होते. पिण्यासाठी पाणी अपुरे पडतेच तसेच जनावरांसाठी देखील पाण्याची हेळसांड होते. तर सोलापुरातील मोहोळ येथे महिलांनी लाटणं मोर्चा काढला आहे. सीना नदीतून शहराला पाणी सोडण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सोलापुरातील मोहोळ येथे महिलांचा ‘लाटणं मोर्चा’
