केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मंजूर केली आहे.आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांच्या पुढील पगार ही वाढ जमा केली जाणार आहे.
यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे. सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर १२,८६८.७२ रुपयांचा बोजा वाढणार आहे.